Monday, November 17, 2008

संस्कृति
संस्कृति शेवटी संस्कृति म्हणजे बाजरीची भाकरी ,वांग्याचे भरित "गणपती बाप्पा मोरयाची"मुक्त आरोळी, केलीच्या पानातील भाताची मुद आणि त्यावरचे वरण,उघड्या पायानी तुडावलेल्या गंगेचा काठ . मारुतीच्या देवलात शनिवारी एका दमात फोडलेल्या नारलातले उडालेले पाणी दुसरयाना पाय चुकून लागल्यावर देखिल आपण प्रथम केलेला नमस्कार -दिव्या दिव्या दिपत्कार,आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी मारुतीची न जळनारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी -दसर्याला वाटायची आपट्याची पाने -पंडरपुरचे धुल आणि अबीर यांच्या सम प्रमाणात मिसलून खालेले डाले आणि साखर फुटाने -सिंह गडावर भरून आलेली छाती आणि दिग्वंत आप्तांच्या मुठभर अस्थिचा गंगा पर्नाच्या वेळी झालेला स्पर्श -कुभातल्या चाकावर फिरनार्या गोळ्याला त्याचे पाण्याचे भिजलेले नाजुक हाथ लागुन धारधार मडके घडावे तसा ह्या अदृश्य पण भावनाने भिजलेल्या हातानी हा पिंड घडत असतो कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कप -बशिचा

No comments: