Wednesday, November 19, 2008

kuni tari asav

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहनारण
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

Monday, November 17, 2008

aathavtey ka tula !!!!!!!!!!!

आठवतेय का तुला !!

आठवतेय का तुला
आपली ती पहिली भेट
लपून छापून होणारी
अपुली गला भेट !

आठवते का तुला
पहिला बघितलेला सिनेमा
भीती वाटते म्हणुन
हळूच डोळे झाकनारा !

आठवतेय का तुला
पहिल घेतलेल शहाल
दोन stro घालून
आपल ते पीण !

आठवतेय का तुला
ती सौम्य संध्याकाल
हातात हात घालून
आपल डोळ्यात बघन !

आठवतेय का तुला
वाट माझी पाहन
उशिरा आलो म्हणुन
नाटकी तुझ रुसन !

विसरु नको अस पटकन
आपल लग्न झाल तरीही
मूलं प्रमाने मलाही वेळ दे
वय आपल सरतय तरीही !!!!!!


...............मनाली सावंत
jivan

जीवनाचे गणित नीट मांडायच असत
बेरीज ,वजाबाकी याना घबरायाच नसत
प्रयात्नानी स्वत :ला फुलावयाच असत
अपयशाने कधी खाचायाच नसत
सर्वनिच माडासारख वाडायच नसत
एकट्यानेच आकाशात भिडायच नसत
वटवृषा सारख घनदाट व्हायच असत
जन्मलेल्याना शनभर कुशीत घ्यायच असत
चंदनासारख सतत झिजायच असत
सुग्नधाने इतराना सुखावयाच असत
मानवाने दानव कधी व्हायच नसत
मनुसकिच्या आधाराने मानवच रहयाच असत
जीवनाच आव्हान अस पेलायच असत
नव्यतुन गुलाबा सारख फुलाय्च असत


manali sawant
svapn

हद्याच्या कोपरयात
एक सुंदर स्वप्न दडले आहे
लहानपनापासुनाच स्वप्न
मानत माझ्या जपल आहे
एक असाव घर आपल
त्या शहरा पलिकडे
सुंदर झोपाला असावा
आपल्या त्या घरापुडे
असावे सुंदर नज़ारे
वृक्ष वेली पाने फूले
नजर लागन्याजोगे सारे
सुंदर घर अपुले असावे
जेथे जपल्या जाव्यात नाती सर्व
दिवस जावेत मजेत हसत
हेवा वाटेल तुम्हा सर्वाना
बघून माझ्या सुंदर स्वप्नाला
पण ..........
एक भीती वाटते
हे स्वप्न माझ स्वप्नच राहणार नाहि ना !!!
manali sawant
tu kon?

आठवे ना प्रथम
केव्हा पाहिले मी तुला
पण प्रत्येक वेळी
तुझे रूप नुतनच भासे मला
तुला पाहिले मी किनार्याला भेटताना
तुला पाहिले मी शितिजाला लोटाताना
तुला पाहिले मी चंद्रा सही खेलताना
तुला पाहिले मी सूर्याला झेलताना
न कले अजुनही मला
खरे रूप तुझे कोणते ?
खवललेला तू खरा की ,
संथ वाहता तू झरा
उठती लहरी तुझ्यात जेव्हा
दिसशी फारच मोहक तेव्हा
तू आहेस आन्दाचा शील
म्हनुनच म्हणतात का तुला ______?


manali sawant
majhe ashru

अश्रु डोळ्यातले डोळ्यातच कसे साठवायचे
डोळ्याच्या काठानी आणखी किती भार पेलायचे

तू नसतोस तेव्हा अश्रु डोळ्यानाच जड़ होतात
आठवनी तुझ्या मनास मोहरून जातात

गोष्ट एक क्षणाची क्षणातच कशी ठेवायची
गोष्ट अशी की शब्दातच कशी साठवयची

तू माझा नाहि हे सत्यच कडू आहे
तुझ्या मार्गातुन जाने हेच पटत आहे

तुझ्या आठवनी व अश्रु हेच सोबत आहेत
आणि न कळत अश्रु ओघलत आहेत


manali sawant
jivan

जीवन
दुसर, तीसर काही नसत
जीवन म्हणजे युद्धच असत
प्रत्येक जन प्रत्येकाच्या
सुखासाठी झगडत असतो
प्रेम नसत माया नसते
मोहजालच ते असत
वर्तमान भविष्याची
ति एक तरतूद असते
स्वर्थापुडे आई नसते
बहिण नसते ,नाती नसतात
जीवनावरच्या पटावरची ति
फ़क्त सोंगति असतात
जीवन म्हणजे काय असत ?
जीवन म्हणजे काहीच नसत
जून तर जातच असत
नव्यालाही जायच असत
दुसर ,तीसर काही नसत
जीवन म्हणजे युधाच असत